वैनगंगा नदीच्या पुलावरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली पूर परिस्थितीची पाहणी

गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. 

    गडचिरोली : सध्या राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूर परिस्थितीही निर्माण झाली आहे. त्यातच गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली.

    जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे यांसारख्या विविध जिल्ह्यात पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरु आहे. त्यातच विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वैनगंगा नदी परिसरात पावसाचा जोर कायम आहे. तेथील पूर परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना व पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणी पातळी व उपाययोजनेसंदर्भात माहिती दिली.