चैत्यभूमीवर लोटला भीमसागर! राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही चैत्यभुमीवर उपस्थित राहुन बाबसाहेबांना अभिवादन केलं.

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Mahaparinirvan Din) यांचा आज 67 वा  महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त आज देशभरातुन त्यांचे अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभुमीवर दाखल होत आहेत. सकाळपासुन मोठा जनसागर आज पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवाह यांनीही चैत्यभुमीवर उपस्थित राहुन बाबसाहेबांना अभिवादन केलं.

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एक विचारवंत आणि समाजाला दिशा देणारं एक व्यक्तिमत्त्वं अशी ओळख असणाऱ्या बाबासाहेबांना आज संपूर्ण देश अभिवादन करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही चैत्यभुमीवर उपस्थित राहुन बाबसाहेबांना अभिवादन केलं.

    पंतप्रधान मोदींनीही केलं अभिवादन

    पंतप्रधान मोदी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केलं. ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते. त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या चांगल्यासाठी जीवन समर्पिक केलं. आज, त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो’, असं पंतप्रधानांनी म्हटलं.