रेशीमबागला टक्कर! हिंदुत्ववादी संघटनांचे नवे सत्ताकेंद्र ‘दादर’?; शिवसेना भवनाशेजारी शिंदे गट थाटणार मध्यवर्ती कार्यालय?

शिवसेनेचे मुख्यालय (Shivsena Headquarter) असलेल्या शिवसेना भवन (Shivsena Bhavan) जवळच शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय (Shinde Group Central Office) उभारण्यात येणार आहे. या सर्व घडामोडीत मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण 'दादर' (Dadar) हे हिंदुत्ववादी संघटनांचे नवे सत्ताकेंद्र बनत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

    मुंबई :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांना हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून आव्हान देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केले इतकेच नाही तर शिंदे गटाने शिवसेना पक्ष (Shivsena Party), निवडणूक चिन्ह (Election Symbol) आणि दसरा मेळावा (Dasara Melava) यावर आपला दावा (Claim) सांगितला आहे.

    शिवसेनेचे मुख्यालय (Shivsena Headquarter) असलेल्या शिवसेना भवन (Shivsena Bhavan) जवळच शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय (Shinde Group Central Office) उभारण्यात येणार आहे. या सर्व घडामोडीत मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण ‘दादर’ (Dadar) हे हिंदुत्ववादी संघटनांचे नवे सत्ताकेंद्र बनत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी दादर येथील शिवाजीपार्क मैदानात जाहीर मेळावा घेऊन शिवसेनेच्या स्थापनेची घोषणा केली. त्यानंतर संघटनेचा अधिकृत पहिला मेळावा घेण्याचे बाळासाहेबांनी ठरवले. दसऱ्याला सार्वजनिक सुट्टी असल्याने बाळासाहेबांनी ३० ऑक्टोबर १९६६ हा दिवस निवडला आणि शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कात पार पडला (Shiv Sena’s first Dasara Melava was held at Shivaji Park). तेव्हापासून शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा सुरु झाली.

    शिवसेनेची स्थापना मराठीच्या मुद्यावरून झाली मात्र हळूहळू शिवसेनेने अर्थात बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना – भाजप युतीची घोषणा झाली ती दादरच्या शिवाजीपार्क मैदानातूनच. यामुळे तर त्यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ (Hindu Hirday Samrat) ही उपाधी मिळाली. पश्चिमेला शिवाजीपार्क आणि बाजूलाच स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक तर पूर्वेला भाजपचे वसंतस्मृती कार्यालय यामुळे दादरला हिंदुत्ववाद्यांचा ओढा होताच.

    राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने या पक्षाची स्थापना केली. त्याचीही अधिकृत घोषणा आणि पहिली जाहीर सभा शिवाजीपार्क मैदानात घेण्यात आली. राज ठाकरे यांचे जुने निवासस्थान कृष्णकुंज आणि आता नवीन निवासस्थान शिवतीर्थ (Shivtirtha) हे ही दादरमध्येच आहे. तर त्यांचे प्रमुख कार्यालय ‘राजगड’ (Rajgad) हे सुद्धा शिवसेना भवनच्या अगदी जवळच आहे. राज ठाकरे यांनीही आता मराठीच्या मुद्यावरून हिंदुत्वाची भूमिका हाती घेतली आहे. राज यांचे मस्जिदीवरील भोंग्याचे आणि हनुमान चालिसाचे राजकारण चांगलेच गाजले. याच मुद्यावरून त्यांना ‘हिंदुजननायक’ (Hindu Jan Nayak) ही उपाधी मिळाली.

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकारची सत्ता स्थापन केली. यावरून भाजपने शिवसेनेवर टीकेची झोड उठविली होती. तर, अडीच वर्षानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली. हिंदुत्वाचा नारा देत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे यांच्यासोबत असलेल्या ४० आमदारांनीही आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याच्या दावा करत दसरा मेळावा शिवाजीपार्क येथेच घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

    शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarwankar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दादरमध्ये एक मध्यवर्ती कार्यालय उघडणार असल्याची माहिती देतानाच त्यासाठी शिवसेना भवनापासून जवळच असलेल्या ‘वास्तू सेंट्रल’ इमारतीची पाहणी केली. या इमारतीपासून काही अंतरावरच कोहिनूर मिलची जागा आणि शिवसेना भवन आहे. या इमारतीमधील दोन मजले भाड्याने घेण्यात येणार असून येथेच शिंदे गट आपले मध्यवर्ती कार्यालय स्थापन करणार आहे.

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रीय स्मारक, भाजपचे वसंतस्मृती कार्यालय, शिवसेनेचे शिवसेनाभवन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शिवतीर्थ निवासस्थान आणि राजगड हे कार्यालय आणि आता शिंदे गटाचे मुख्य कार्यालय यामुळे आधीच गजबजलेले दादर आता हिंदुत्वाच्या हुंकाराने दुमदुमणार आहे. शिंदे गटाचे दादरमधील कार्यालय ही खेळी शिवसेनेला अडचणीत आणणारी ठरणार असली तरी ‘दादर’ हे हिंदुत्ववादी संघटनांचे नवे सत्ताकेंद्र झाल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.