डॉक्टरांना औषधांची कमतरता नव्हती, घडलेल्या घटनेवर सरकार गंभीर, सखोल चौकशी होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या 24 तासांत दर तासाला एक म्हणजेच 24 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. आता ही संख्या 31 वर गेली आहे. सदर घटनेवर कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची सखोल चौकशी होणार असल्याचे सांगत, रुग्णालयात औषधांचा साठा पुरेसा होता. औषधांची कमतरता होती त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी खोडून काढला. पाहूया नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री, पाहा सविस्तर

    औषधांच्या तुटवड्याचा विषय गंभीर

    रुग्णालयाची दररोजची ओपीडी साधारणतः दोन हजारांवर आहे. या ठिकाणी नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम आणि शेजारील तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्णांची संख्या वाढत असताना औषधांच्या तुटवड्याचा विषयही गंभीर होत चालला आहे. आजही रुग्णांना बाहेरून औषधी आणण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णालयात अत्यावश्यक औषधी नसल्यामुळे शेजारील जिल्ह्याच्या रुग्णालयात एक्स्पायरी डेट संपत असलेल्या औषधींचा साठा असल्याचे समोर आले आहे.