cm eknath shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें म्हणाले की, महापालिका आयुक्त,अधिकारी युद्धपातळीवर कामाला लागले आहे. विकासकामांमुळे होत असलेल्या प्रदुषणावर नियंत्रणांत आणण्याचे आदेश दिले आहेत.

    गेल्या काही दिवसापासून देशातील मोठ्या शहरामध्ये प्रदूषण (Pollution) वाढलं आहे. राजधानी दिल्लीत वाढलेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. कृत्रिम पाऊस पाऊस पाडून प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता हाच प्रयोग मुंबईत करण्यात येणार आहे. वाढलेल्या प्रदूषणाचे फटका मुंबईला बसला आहे. गेल्या काही दिवसापासून मुंबईच प्रदूषण वाढलं आहे. या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी मुंबई महापालिकेनं उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.  प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यकता भासल्यास दुबईतील कंपनीशी करू कृत्रीम पाऊस पाडू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हण्टलं आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडून बिएमसीच्या कामांचा आढावा घेण्यात आला . वांद्र्यातील कलानगर उड्डाणपुलापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जुहू तारा रस्त्यापर्यंत मुख्यमंत्री शिंदेंनी स्वच्छतेची पाहणी केली. या वेळी वांद्रे पूर्व,पश्चिम भागातील नागरिकांशी संवाद साधला.

    संपूर्ण मुंबई स्वच्छ करणार  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबईत वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक काम करण्यात येत आहे.  बिएमसीकडून मुंबई द्रुतगती महामार्ग पाण्यानं स्वच्छ करण्यात येत आहे. पालिकेकडून रस्त्यावर पाणी फवारुन स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, महापालिकेच्या उपाययोजनांची पाहणी केली. रस्ते धुतले जात आहे. माती काढली काढली जात आहे. पाण्याची फवारणी केली जात आहे. हजार टँकर भाड्याने घेऊन मुंबई धुण्याचे आदेश दिले आहे. बांधकाम व्यावसायिकांनी सहकार्य करावे. स्प्रिंकलर,स्मॉगरचा वापर करून हवेतील धुलीकण कमी करण्यास मदत होणार आहे.

    पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदें म्हणाले की, महापालिका आयुक्त,अधिकारी युद्धपातळीवर कामाला लागले आहे. विकासकामांमुळे होत असलेल्या प्रदुषणावर नियंत्रणांत आणण्याचे आदेश दिले आहेत. एक दिवसाआड मुंबईतले रस्ते धुतले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास कृत्रिम पावसाचा प्रयोगही करणार आहे. दुबईतील कंपनीशी कृत्रिम पावसासाठी सामंजस्य करार करण्यात येईल. मुंबईतील बागांमध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या विभागांतील साफसफाईची पाहणी करणार आहे. कलानगरपासून सुरूवात केली आहे. केवळ कलानगर नाही तर संपूर्ण मुंबई स्वच्छ करणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.