मुख्यमंत्री शिंदे आज नांदेड, हिंगोली दौऱ्यावर; पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी

पावसाने नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबला असून यामुळे विरोधी पक्षांसह नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात आहेत.

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज नांदेड (Nanded), हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर (Heavy Rain) आहे. शेतकऱ्यांचे पावसामुळे आलेल्या पुरात (Flood) मोठे नुकसान झाले आहे. त्यातच राजकीय नाट्याने मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) लांबल्याने नागरिक संतप्त होते. त्यामुळेच मुख्यमंत्री दौरा (CM Tour) करणार आहेत.

    पावसाने नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबला असून यामुळे विरोधी पक्षांसह नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात आहेत.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यात आज सोमवार ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.१५ वाजता मुंबई येथून विमानाने श्री गुरुगोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन आणि मोटारीने गुरूद्वाराकडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी १२ ते १२.३० वाजेपर्यंत गोदावरी अर्बन बँकेस भेट देतील. दुपारी १२.४० ते १.१५ वाजेपर्यंत नांदेड उत्तर मतदारसंघातील पूरग्रस्तबाधित भागाची पाहणी करतील. दुपारी १.१५ ते १.४५ वाजेपर्यंत भक्ती लॉन्स नांदेड येथील मेळाव्यास उपस्थिती राहतील. दुपारी १.४५ ते २.३० वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव असेस. दुपारी २.३० वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण करतील. त्यानंतर रात्री ८.३० वा. हिंगोली येथून नांदेड विमानतळ येथे आगमन आणि शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.