मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्या दिल्ली दौरा, वेदांताबाबत पंतप्रधानांची भेट घेणार

महाराष्ट्राचा कारभार दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतो. मोदी-शाह (modi shah) यांच्या इशाऱ्यावरच एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे काम करत आहेत, अशी बोचरी टिका विरोधकांनी केली आहे. त्यामुळं वेदांत प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्याची हालचाली मुख्यमंत्र्याकडून सुरु असून, याच धरतीवर ते उद्या दिल्ली दौरा करणार आहेत.

    मुंबई : सध्या राज्यात वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळं यावर बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. यावरुनच आता विरोधक आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्याचे काम करत आहेत, टिका करत आहेत. महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात जाणे हे अत्यंत गंभीर असून, महाराष्ट्राचा कारभार दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतो. मोदी-शाह (modi shah) यांच्या इशाऱ्यावरच एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे काम करत आहेत, अशी बोचरी टिका विरोधकांनी केली आहे. त्यामुळं वेदांत प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्याची हालचाली मुख्यमंत्र्याकडून सुरु असून, याच धरतीवर ते उद्या दिल्ली दौरा करणार आहेत.

    दरम्यान, वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गमावल्यानंतर सर्व स्तरातून शिंदे फडणवीस सरकारवर टिका झाल्यानंतर याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बैठका घेऊन वेंदात परत राज्यात आणू असं आश्वासन दिलं आहे. तसेच याबाबत पंतप्रधानांशी भेटणार असं मुख्यमंत्री म्हणाले होते. यामुळं ते उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असून, राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदेंचा हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) आणि अश्विनी वैष्णव यांची देखील भेट घेणार आहेत. तसेच वेदांताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे.