नाशिकच्या ‘या’ घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; आता करणार असं काम की…

नाशिक जवळील (Nashik) वंजारवाडी येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath shinde) दखल घेतली आहे. त्यांनी मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे म्हटले आहे.

  नाशिक : नाशिक (Nashik) येथील वंजारवाडी गावात (Vanjarwadi Village) झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) पहाटेच्या सुमारास ढगफुटी झाली. तेथील गवारी कुटुंबाचे (Gawari Family) राहते घर पडून पती-पत्नी दोघांचेही दुर्देवी दुःखद निधन झाल्याची घटना घडली होती.

  सदर घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना कळताच, त्यांनी मदतीचे (Help) निर्देश दिले आहेत. सदर कुटुंबातील गवारी कुटुंबाच्या पश्चात त्यांना तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्य असून या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यात येणार आहे.

  नाशिक शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वंजारवाडी गावात गुरुवारी रात्री अति मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे एका घराची भिंत कोसळल्याने पहाटे तीन वाजेच्या सुमारास पती-पत्नीचा मृत्यू झाला. वंजारवाडी येथे आठ दिवसांपूर्वी ढगफुटी सदस्य पाऊस होऊन दीडशे ते दोनशे हेक्टर जमीन वाहून गेली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गुरुवारी रात्री नाशिक शहरासह परिसरात अति जोरदार पाऊस झाला. वंजारवाडी येथेही सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता.

  सदर कुटुंब हे बेघर असल्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख योगेश म्हस्के यांच्या सर्वज्ञ श्री फाउंडेशनकडून एक लाख रुपयांचा धनादेश पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून करण्यात येईल असे मंगेश चिवटे यांनी सांगितले आहे. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत वंजारवाडी चे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, संपर्क समन्वयक योगेश मस्के, जितेंद्र सातव, वंजारवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते

  काय घडली घटना

  दरम्यान या मुसळधार पावसाची उद्याच्या शेतकामाची आखणी करून गाढ झोपी गेलेल्या पती पत्नीवर काळाने घाला घातला आहे. या पावसात वंजारवाडी परिसरात असलेल्या लालवाडी शिवारात हि दुर्देवी घटना घडली आहे. लालवाडीत असणाऱ्या गवारी कुटुंबाचा घरासह आयुष्याचा पायाच उध्वस्त झाला आहे. छबु सिताराम गवारी यांच्या घराची पहाटे तीन वाजता अचानक भिंत कोसळली.

  या घटनेत छबु सिताराम गवारी आणि मंदाबाई छबु गवारी यांचा झोपेतच मृत्यू झाला. रात्री हा प्रकार लवकर लक्षात आला नाही. सकाळी घडला प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. दरम्यान आठच दिवसांपूर्वी सिन्नर परिसरात झालेल्या अतिवृष्टीनंतर नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करण्यात आली होती.