cng

महागाईने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असतानाच एक गूड न्यूज आली आहे. दसरा व दिवाळी सणांच्या तोंडावर गॅसचे दर कमी झाले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने (MGL- Mahanagar Gas Limited) मुंबई आणि उपनगरात सीएनजीचे दर 3 रुपये प्रति किलोग्रॅमने कमी केले आहेत.

    मुंबई : सर्वसामान्यांना एक दिलासादायक व आनंदाची बातमी समोर येत आहे. महागाईने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असतानाच एक गूड न्यूज आली आहे. दसरा व दिवाळी सणांच्या तोंडावर गॅसचे दर कमी झाले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने (MGL- Mahanagar Gas Limited) मुंबई आणि उपनगरात सीएनजीचे दर 3 रुपये प्रति किलोग्रॅमने कमी केले आहेत. तसेच घरगुती पीएनजीचे दर 2 रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील सीएनजीच्या किमती 76 रुपये प्रति किलोग्रॅम झाल्या आहेत. नवे दर 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून आणि 2 ऑक्टोबरच्या पहाटेपासून लागू केले आहेत. (cng cheaper by three rupess in mumbai and suburbs domestic png cheaper by two rupess know the prices in your city)

    वर्षात दुसऱ्यांदा दर कमी…

    दरम्यान, एप्रिलनंतर सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली असून, या वर्षात दुसऱ्यांदा सीएनजी व पीएनजीचे दर कमी झाले आहेत. मुंबई व उपनगरात सीएनजीवर मोठ्या प्रमाणावर गाड्या चालतात. त्यामुळे महानगर गॅसने दर कमी केल्याने त्याचा थेट फायदा अनेकांना होणार आहे. मुंबईत एप्रिलच्या आधी सीएनजीचे दर 87 रुपये किलोग्रॅम होते तर पीएनजीचे दर 54 रुपये प्रति एससीएम होते. यानंतर दर कमी करण्यात आले.

    यापूर्वी किती रुपयांनी दर कमी?

    यापूर्वी एप्रिल महिन्यातही महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किंमतीत 8 आणि पीएनजीच्या किंमतीत 5 रुपये प्रति एससीएमची कपात केली होती. त्यामुळे तेव्हा सीएनजीचे दर 79 रुपये प्रति किलोग्रॅम झाले होते. तर पीएनजीचे दर 49 रुपये झाले होते. यानंतर दुसऱ्यांदा दर कमी करण्यात आल्यानं सामान्यांना दिलासा मिळाला आहे. महानगर गॅस लिमिटेडने नव्या दराचे आदेश 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून आणि 2 ऑक्टोबरच्या पहाटेपासून लागू केले आहेत.