गोंदियात ट्रेन अपघात; डबा रुळावरुन घसरला, 50 जण जखमी

रायपुरहून नागपुरच्या दिशेनं जाताना हा अपघात झाला. या अपघातात 50 जणा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

    गोंदिया : नुकतीच पुणे-अहमदनगर मार्गावर कारच्या अपघाताची घटना ताजी असतानाचं आता विदर्भातून भीषण अपघाताची एक बातमी समोर येत आहे. गोंदियामध्ये रायपुरहून नागपुरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेनचा (Gondia Train Accident) अपघात झाला आहे. या अपघातात 50 हून अधिक लोकं किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.


    रायपूर-नागपूर भगत की कोठी ही ट्रेन गोदिंया येथून जात असताना मालगाडीला ट्रेनने धडक दिली. धडक झाल्यानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळावरून खाली घसरला. या अपघातात जवळपास 50 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.