भाजपच्या प्रचाराचा नारळ औरंगाबादेत फुटणार; जे. पी. नड्डा यांची २ जानेवारीला जाहीर सभा, शिवसेनेच्या १२ जागांवरही दावा

जे पी नड्डा यांचा दौरा मंगळवारी (२७ नोव्हेंबर) रात्री जाहीर झाला. त्यामुळे आता स्थानिक भाजप नेत्यांकडे सभेची तयारी करण्यासाठी अवघ्या पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. एवढ्या कमी वेळेत सभेची तयारी करणे भाजप नेत्यांसमोर आव्हान आहे. सोबतच सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात गर्दी जमवताना प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत.

    औरंगाबाद : शिवसेनेकडे (Shivsena) असलेला औरंगाबाद (Aurangabad) मतदारसंघही भाजप (BJP) लढवणार असल्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची रणनिती भाजपने आखली आहे. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. Nadda) यांच्या उपस्थितीत २ जानेवारी रोजी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये शिवसेनेने लढवलेल्या २३ जागांपैकी १२ जागांवर दावा करत एकूण ४० जागा यंदा लढवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. नव्या समीकरणात शिंदेसेनेच्या वाट्याला केवळ ८ जागा येण्याची शक्यता आहे.

    जे पी नड्डा यांचा दौरा मंगळवारी (२७ नोव्हेंबर) रात्री जाहीर झाला. त्यामुळे आता स्थानिक भाजप नेत्यांकडे सभेची तयारी करण्यासाठी अवघ्या पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. एवढ्या कमी वेळेत सभेची तयारी करणे भाजप नेत्यांसमोर आव्हान आहे. सोबतच सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात गर्दी जमवताना प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत. शिवसेनेच्या १८ मधील १२ खासदार एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वात दाखल झाले. या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली होती.

    मित्रपक्ष सोडून गेल्यानंतर राहिलेल्या एकूण २१२ लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. औरंगाबाद, बुलडाणा, रामटेक, हिंगोली, परभणी, पालघर, ठाणे, शिर्डी, उस्मानाबाद, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबई दक्षिण या सेनेकडील जागांवर भाजपची नजर आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील रायगड, शिरूर आणि साताऱ्यासाठी तयारी सुरू केली आहे.