cold wave in rajasthan

मागील काही दिवसांपासून मुंबईत थंडी वाढली आहे. सोमवारी सकाळपासून वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे मंगळवारी मुंबईतील किमान तापमान १५ अंश किंवा त्याहून कमी असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी उबदार कपडे परिधान करणे पसंद केले आहे.

    मुंबई : सध्या राज्यात थंडीचे (cold) प्रमाण वाढले आहे. निम्मापेक्षा अधिक महाराष्ट्र (Maharshtra) गारठला आहे. उत्तर (north) भारतातून एकापाठोपाठ आलेले दोन्ही पश्चिमी चक्रवात तसेच काश्मिरातील बर्फवृष्टी यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात (temperature) ४ ते ५ अंशांची घट झाली. यामुळं कमालीची थंडी वाढली असून, सर्वंत्र हुडहुडी वाढली आहे. तसेच आता मुंबईत (Mumbi) हुडहुडी वाढली आहे, त्यामुळं मुंबईकर गारठले आहेत. या थंडीचा आरोग्यावर देखील परिणाम होत असून, दमा, श्वसनाचे विकार व आजार असणाऱ्यांना या थंडीमुळं त्रास होतोय, असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. प्रचंड थंडीमुळं गारठलेले नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत.

    दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबईत थंडी वाढली आहे. सोमवारी सकाळपासून वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे मंगळवारी मुंबईतील किमान तापमान १५ अंश किंवा त्याहून कमी असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी उबदार कपडे परिधान करणे पसंद केले आहे. अशातच आज मुंबईचे किमान तापमान सोमवारपेक्षाही कमी नोंदवले जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळं मुंबईकर सध्या गारठल्याच चित्र आहे.

    मुंबईमध्ये सकाळी वातावरण थंड असेल. तसेच, येत्या सहा दिवसांमध्ये मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा २९ अंशांच्या पलीकडे जायची शक्यता कमी असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. २४ ते २६ जानेवारी या तीन दिवसांच्या काळात मुंबईत सकाळी धुक्याचे वातावरणही असेल. मुंबईत मंगळवारी किमान तापमान १४ अंश किंवा त्याहून कमी असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात उर्वरित भागात मात्र कमाल आणि किमान तापमान सरासरीहून अधिक आहे. तसेच, सोमवारी सकाळी सांताक्रूझ येथे १५.६, तर कुलाबा येथे १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली.