राज्यात थंडीची लाट; ओझरमध्ये सर्वात कमी ६ अंश सेल्सियसची नोंद

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून किमान तापमानात घसरण सुरु झाली आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, लडाखमध्ये बर्फवृष्टी होत असून उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांनी गुजरात, महाराष्ट्रातील किमान तापमान घसरले आहे. महाबळेश्वर येथील वेण्णालेक परिसरात रविवारी सकाळी तापमान एकदम घटले आहे.

    मुंबई – उत्तर भारतातील हिमवृष्टी (Snow Fall) आणि उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात (Maharashtra) थंडी वाढली आहे. त्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले असून महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) १०.६ अंश सेल्सियस तापमान असून त्यापेक्षा औरंगाबाद (Aurangabad), नाशिक, धुळे, जळगावात पारा खाली आला आहे. नाशिक जिल्ह्यात ओझर (Ozar) येथे रविवारी सर्वात कमी म्हणजे ६ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली.

    ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून किमान तापमानात घसरण सुरु झाली आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, लडाखमध्ये बर्फवृष्टी होत असून उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांनी गुजरात, महाराष्ट्रातील किमान तापमान घसरले आहे. महाबळेश्वर येथील वेण्णालेक परिसरात रविवारी सकाळी तापमान एकदम घटले.

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, चक्राकार वारे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच त्या परिसरातच समुद्रसपाटीपासून साडेसात किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. वायव्येकडे सरकणारी ही प्रणाली किनाऱ्याकडे अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील राज्यात पाऊस पडणार आहे.