नामांतरणाचे पडसाद! उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या ३० अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांचे सामुहीक राजीनामे

उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात यावे असा ठराव मंजूर केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी याबद्दल तीव्र विरोध होताना दिसत आहे. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

    उस्मानाबाद  : उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यात आले आहे. काही ठिकाणी शिवसैनिकांनी जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलं.तर, कुठे या निर्णयाला विरोध दर्शवला जातोय. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय फारसा रुचलेला दिसत नाही आहे. या पडसाद म्हणून त्यांनी नामांतरणाला विरोध म्हणून तब्बल ३० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

    उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात यावे असा ठराव मंजूर केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी याबद्दल तीव्र विरोध होताना दिसत आहे. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी या प्रस्तावाला विरोध करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी विरोध न केल्याने राजीनामा देत असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यात प्रदेश सचिव मसुद शेख, शहराध्यक्ष आयाज शेख,कादरखान पठाण,खलीफा कुरेशी,बाबा मुजावर, इस्माईल अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असद खान अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष बाबा फैजोद्दीन ,मोनोद्दीन पठाण,मन्नान काझी,अन्वर शेख,अतीक शेख,मन्नान काझी,सरफराज कुरेशी,लईक सरकार,आवेज मोमीन महेमुद मुजावर,जाकेर पठाण,मन्जुंर भाई,ईस्माईल काझी,गयाज मुल्ला,ईलीयास पिरजादे,बीबाल तांबोळी आदी पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.