
मंगळवेढा येथे कॉलेजला गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन कॉलेज तरुणीस अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडल्याने तीच्या वडीलांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवेढा : मंगळवेढा येथे कॉलेजला गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन कॉलेज तरुणीस अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडल्याने तीच्या वडीलांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी, श्री संत दामाजी कॉलेजच्या गेटवर दि.11 रोजी सकाळी 7. 30 वा. त्या अल्पवयीन मुलीस तीच्या वडिलांनी गाडीवर नेवून सोडले होते. वडील पुन्हा 11.30 वा. मुलीस आणण्यासाठी गेले असता ती गेटवर न दिसल्यामुळे वडिलांनी तीच्या वर्गात जाऊन विचारपूस केल्यावर ती सकाळी 8.00 वा. कॉलेजमध्ये आली नसल्याचे समजले.
दरम्यान त्यानंतर वडिलांनी घरी व अन्यत्र चौकशी करून शोध घेतला असता ती मिळून आली नसल्याने कायदेशीर रखवालीतून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तीचे वर्णन-उंची 5 फुट, चेहरा गोल व नाक सरळ, अंगात नेसणेस लाल टॉप, पांढरी पँट, शिक्षण बारावी चालू अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.