“बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी”… ओळखा पाहू हे राजकारणातील कवी?तुमचा अंदाज नक्कीच चुकणार

मुंबई : शीघ्र कवी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ओळख आहे. झटपट चारोळ्या करण्यात त्यांचा हात कुणी धरणार नाही. कविता करुन ते जाहीर कार्यक्रमांमध्ये रंगत आणतात. मात्र आता त्यांना शह देण्यास अजून एक राजकीय व्यक्ती शीघ्र कवी बनले आहेत. विशेष म्हणजे खुद्द रामदास आठवले यांना वाढदिवसानिमित्त त्यांनी कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

रिपाई नेते रामदास आठवले यांचा आज (२५ डिसेंबर)ला वाढदिवस असतो. त्यांना सर्वच स्तरांतून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत. सोशल मीडियावरही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामध्ये गाजतायेत त्या म्हणजे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या शुभेच्छा.अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आठवलेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

देशमुखांची कविता खुद्द आठवलेंच्याच शैलीत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आठवलेंना दिलेल्या या शुभेच्छा सध्या अनेकांच्याच चेहऱ्यावर स्मित आणत आहेत. तसेच यानिमित्ताने राजकीय वर्तुळात देशमुखांमुळे महाराष्ट्राला अजून एक शीघ्र कवी मिळाल्याची चर्चा आहे.