comic conn india

जगभरात गाजलेली कॉमिक उद्योगातील (Comic Con India) नावं ते भारतातील प्रसिद्ध सुरस कहाण्या सगळेच आपले पुरेपूर मनोरंजन केलं आहे. आता मुंबईत (Mumbai) हा अनुभव घेण्याची संधी आहे.

  मुंबई: बेंगळुरू आणि दिल्लीनंतर कॉमिक कॉन इंडिया मुंबईत (Comic Con In Mumbai) 10 वी आवृत्ती घेऊन परत येतोय. देशात असा पॉप संस्कृतीला समर्पित भव्य सोहळा कधीही साजरा झाला नसेल. जगभरात गाजलेली कॉमिक उद्योगातील नावं ते भारतातील प्रसिद्ध सुरस कहाण्या सगळेच आपले पुरेपूर मनोरंजन केलं आहे. आता मुंबईत (Mumbai) हा अनुभव घेण्याची संधी आहे. (Comic Con India)

  • कॉमिक कॉनचं ठिकाण – जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर, बीकेस, मुंबई
  • तारीख – 11 आणि 12 फेब्रुवारी
  • इच्छुकांना www.comicconindia.com आणि बुक माय शो पासेस मिळवता येतील.

  मारुती सुझुकी एरेना मुंबई कॉमिक कॉन, सह-सादरकर्ते मेटा’चा संयुक्त विद्यमाने आणि क्रन्ची रोल अँड बोटच्या साथीने अनेक सुप्रसिद्ध प्रकाशन गृहं जसे की अमर चित्र कथा, राज कॉमिक्स, विझ मीडिया, कोडान्शा, डीसी, मारव्हेल आणि अन्य आपल्या सर्वोत्तम व्यक्तिरेखांसमवेत झळकणार आहेत. लोकप्रिय स्थानिक निर्माते जसे की प्रसाद भट्ट (ग्राफिकरी), सैलेश गोपालन (ब्राऊन पेपरबॅग), डेरेक डोमनिक डिसूझा, सौमीन पटेल, सुमीत कुमार (बकारमॅक्स), मोहम्मद फैझल (गार्बेज बिन), अनंत सागर (मेटा देसी कॉमिक्सचा लेखक आणि कलाकार), शुभम खुराना (कॉर्पोरेट) तसेच रवी राज आहुजा (बुलीजआय’चा लेखक आणि प्रकाशक) मुख्य मंचावर येऊन गर्दीला वेड लावतील.

  यावेळी रोहन जोशी, साहिल शहा, निशांत सूरी, रॅपर शिया आणि झीरो चिल, गिक फ्रूट, मेंटलिस्ट विवेक देसाई, कॉमिक बँड – कॅपाओ त्याचप्रमाणे अन्य मुलखावेगळ्या पाहुण्यांची विशेष कामगिरी पाहण्याची संधी मिळणार आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी, मुंबई कॉमिक कॉन त्यांच्या खास गेमिंग अनुभवाची तिसरी आवृत्ती, लेनोव्हो इंटेल – द अरेना, द एस्कॉर्टस् क्लबच्या सहकार्याने विंडोज 11 समर्थित करेल. तब्बल 40000 स्क्वेअर फूट गेमिंग अरेनामध्ये नवीन गेमिंग तंत्रज्ञान, नवीन लॉन्च करण्यात आलेले गेम, गेमिंग डिव्हाईस इत्यादी अनेक गोष्टी अनुभवता येतील.

  अरेनामध्ये उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड जसे की लेनोव्हो, इंटेल, मायक्रोसॉफ्ट, लॉजिटेक, झोटॅक आणि स्ट्रीमिंग मंच लोको’चा समावेश असेल. युबिसॉफ्ट आणि रायट गेम्ससारख्या ग्लोबल पब्लिशरचे कार्यतत्पर अस्तित्व सोबतच इंडी डेव्हलपर अतिरथ गेमिंग टेक्नॉलॉजी त्यांचे अत्याधुनिक टायटलचं प्रदर्शन करतील. यावेळी व्हॅलोरंट, ब्रॉलहल्ला, फिफा 23, मॉर्टल कॉम्बॅट 11 आणि CS:GO सह विविध टायटलसाठी कार्यक्रमात खास सामुदायिक स्पर्धांमध्ये भाग घेता येईल.

  मुंबई कॉमिक कॉनची 10 वी आवृत्ती डीसी स्टुडिओ आणि वॉर्नर ब्रदर्स (शाझम आणि बार्बी), मार्वल इंडिया (अँट मॅन), युनिव्हर्सल पिक्चर्स (फास्ट एक्स), ऑडिबल (सँडमॅन, हॅरी पॉटर), सेलिओ (ॲनिमी मर्च), क्रन्चीरोल यांसारख्या चाहत्यांच्या अद्भुत अनुभवांनी परिपूर्ण आहे, ॲनिमी, बंदाई नामको’चं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारी काही सर्वात लोकप्रिय जपानी फ्रँचायझी आणत आहे तसेच विझ मीडिया आणि सीमॉन अँड त्शुस्टर इंडियाद्वारे एकाच छताखाली सर्वात मोठे मंगा कलेक्शन’ला विसरून कसं चालेल!

  प्रमुख सहभागी जसे की मारुती सुझुकी एरेना सेलेरियो आणि द ब्रिझा व्हीआर अनुभवांसह त्यांचे अतिशय लोकप्रिय कॉस्प्ले प्रदर्शित करतील. मेटा आश्चर्यकारक रिल, इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या अद्वितीय दुनियेसह लाईव्ह जाईल, चाहते काही आश्चर्यकारक बक्षिसेदेखील जिंकू शकतात. सर्वात शेवटी, BOAT एक अनोखा चाहता अनुभव तयार करेल. इतर भागीदारांमध्ये ऑडिबल, सेलिओ, इनबॉक्स आणि पेटीएम पेमेंट्सचा सहभाग राहील.

  मुंबई कॉमिक कॉनचे पाहुणे आठवडाभर धमाल, उत्साह आणि अनुभवांची लयलूट करणार आहेत, त्यांना अशी मजा अन्यत्र कुठेही मिळणार नाही!

  मुंबई कॉमिक कॉन 2023 बद्दल बोलताना, कॉमिक कॉन इंडिया’चे संस्थापक जतिन वर्मा म्हणाले, “आम्ही मुंबईत 10वी आवृत्ती परत आणताना आणि एक दशक गाठताना एक वर्तुळ पूर्ण करताना खूप रोमांचित आहोत. आम्ही अनेक वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे, हे अतुलनीय आहे. आम्ही भारतातील सर्व कॉमिक चाहत्यांसाठी एक मजेदार, आकर्षक व्यासपीठ तयार करू याची खात्री वाटते. मुंबईकरांनी आमच्यासोबत या चिरंतन आणि लार्जर दॅन लाईफ वीकेंडचे साक्षीदार व्हावे, मला आता आणखी प्रतीक्षा करणं अवघड झालं आहे.”