बचतगटाच्या सक्षमीकरणासाठी चलना देणार – कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड

विकास कामे आणि नागरिकांच्या अपेक्षा यांना खरे रूप आणण्याचा प्रयत्न केला जाईल. असे सांगत महिला बचत गटांना सक्षमीकरण करण्यासाठी कन्सल्टिंग करण्याची गरज आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांची बदली झाल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त आणि २०१६ बँचच्या आय ए एस आधिकारी डॉक्टर इंदूराणी जाखड यांनी शनिवारी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर प्रसिद्धी माध्यमासमोर प्रतिक्रिया दिली की, अधिकाऱ्यांची आज बैठक घेऊन कल्याण डोंबिवली शहराचा आढावा घेत महानगरपालिकेची रूपरेषा समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

    विकास कामे आणि नागरिकांच्या अपेक्षा यांना खरे रूप आणण्याचा प्रयत्न केला जाईल. असे सांगत महिला बचत गटांना सक्षमीकरण करण्यासाठी कन्सल्टिंग करण्याची गरज आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील बचत गटांना चालना देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखड यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केल्याने कल्याण डोंबिवली तील विकास कामांना गती मिळून सर्वसमावेशक विकास होणार तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची अमंलबजावणी प्रभावीपणे होणार असे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.