केडीएमसीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली, नव्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड

    कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी भाप्रसे डॉ. इंदूराणी जाखड यांची महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.आयुक्तांच्या बदलीनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर टिका केली आहे.

    महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याची बदली झाल्यावर आयुक्त दांगडे यांनी १३ जुलै २०२२ रोजी महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला होता. दांगडे हे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मर्जीतील आयुक्त होते. १ वर्षे ३ महिने दांगडे यांनी महापालिका आयुक्त पदाची धुरा संभाळली. या विविध प्रकल्पांना गती देण्याचे काम केले. मात्र सत्ताधारी पक्षातील माजी नगरसेवकांकडून दांगडे यांच्याकडून विकास कामे केली जात नसल्याच ओरड केली जात होती. त्यावर अनेकदा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी बैठका घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. दांगडे काही दिवसापूर्वी प्रशासकीय प्रशिक्षणाकरीता गेले असता त्यांच्या बदलीची आफवा उडविली गेली होती. तसेच ते नुकतेच काही काळ वैदकीय रजेवर गेले होते. तेव्हा देखील त्यांची बदली झाली असून ते पुन्हा कामावर रूजू होणार नाही असे बोलले गेले. मात्र अखेरीस आज दांगडे यांची बदली करण्यात आली आहे. दांगडे यांच्याकड राज्य सरकारच्या पेट्रोकेमिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार देण्यात आला आहे. दांगडे यांच्या जागेवर डॉ. इंदूराणी जाखड यांची वर्णी लागली आहे. जाखड या राज्य सरकारच्या महिला विकास विभागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे त्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार तसाच ठेवून त्यांच्या शिरावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी सरकारने सोपविली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत जे आयुक्त लाभले ते पाहता जाखड या प्रथमच महिला आयुक्त महापालिकेस लाभल्या आहेत.

    मनसे आमदार राजू पाटील यांची सरकारवर टीका –

    मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकार कल्याण – डोंबिवलीत नवनविन आयुक्तांची निवड त्यांचा कार्यकाळ संपण्या आधीच करून टाकतात. आमच्याकडे आयुक्त फेरीवाल्यांसारखे येतात व जातात. परंतु आमच्या स्टेशन बाहेरचे फेरीवाले काही उठवले जात नाहीत. असो ! आता येणाऱ्या नविन आयुक्त नक्कीच चांगले बदल करतील अशी आशा करू या. त्यांचे कल्याण – डोंबिवलीत मनसे स्वागत