आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाची सांगड घालावी : आयुक्त शेखर सिंह

  पिंपरी : विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण पध्दतींसोबतच पारंपारिक शिक्षणाची सांगड घालावी, जेणेकरून उज्वल भविष्याची स्वप्नेपाहणा-या आणि ती साकार करण्यासाठीचा मार्ग अधिक सुखकर होईल, असे मत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंहयांनी व्यक्त केले. आज, दि. २८ रोजी आयुक्त सिंह यांनी चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या “पुनरुत्थान समरसतागुरुकुलम” संस्थेला भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचेअध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, गुरुकुलमच्या मुख्याध्यापिका पूनम गुजर यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होते.

  स्टीम लर्निंग विभागांतर्गत थींगकींग स्पर्धेत

  प्रसंगी, आयुक्त सिंग यांनी प्रयोग शाळेची पाहणी केली. अभियांत्रिकी विभागात बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, नारळाच्या कवटीपासून बनलेल्या कलाकृती, शाडूमातीपासून तयार केलेले गणपती व त्यांच्यापासून पर्यावरणाला होणारे फायदे याबाबत माहितीजाणून घेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. माती परिक्षणातून पिकांसाठी आवश्यक असलेली माती, झाडांच्या वाढीसाठी लागणारे गुणसत्व यबाबत मुलांनी विविध प्रयोगांद्वारे माहिती दिली. चांद्रयान ३ मोहिमेसंदर्भात प्रश्नांची विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. दरम्यान, स्टीम लर्निंग विभागांतर्गत थींगकींग स्पर्धेत निवड झालेल्या गणेश कामठे, सूजन बनसोडे या विद्यार्थ्यांचे आयुक्त सिंग यांनी कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

  दुर्बल वंचित उपेक्षित

  समाजाचा मोठा घटक दुर्बल वंचित उपेक्षित राहिला तर समाजाचा गाडा गतिमान होणार नाही. हे समाजचक्र गतिमान होण्यासाठीपिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत विविध समाज विकास योजना, मुलांसाठी मोफत शिक्षण, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, महिलांसाठीच्या योजनांचा सूरू करण्यात आलेल्या असून समाजातील प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला जातअसल्याचे आयुक्त सिंग यांनी यावेळी सांगितले.

  पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलम संस्थेबददल माहिती

  पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलम संस्थेबददल माहिती दिली. गुरुकुलम शाळेत ३५० च्या वर मुलं शिकत आहेत. ९ जुन २००६ लाशिवराज्यभिषेक दिनी सुरूवात झाली. पहिली ते १२ वी अशा क्रमाने मुले शिकतात. ही मुले प्रामुख्याने फासे पारधी वडार – कष्टकरीवर्गातील आहेत. ज्याच्या पालकांना शिक्षण काय कोणते द्यावे, हे समजत नाही. मुलही शाळेत न जाता भटकत राहतात. याठिकाणी त्यांना मराठी भाषे बरोबरच विज्ञान, संगणक तंत्र कौशल्य जसे शेती-भाजीपाला लागवड, कंपोस्टखत, रोपवाटिका, बांधकाम, सायकल व मोटार सायकल दुरुस्ती, प्लंबीग, रंगकाम इत्यादी बरोबरच मूर्तीकला, संगीत, गायन, वादन, चित्रकला, लेखन, वाचन संभाषण असे एकूण २० विभागात मार्गदर्शन दिले जाते.