Breaking! उल्हासनगरमध्ये कंपनीत स्फोट; तीन ते चार कामगारांचा मृत्यू तर जखमींची संख्या…

उल्हासनगरमधून एक धक्कादायक व दु:खद बातमी समोर येत आहे. उल्हासनगरमध्ये एका कंपनीत स्फोट झाल्यामुळं चार ते पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

    उल्हासनगर – सर्वंत्र गणपती उत्सवाची धामधूम असताना, आणि आज पाच दिवसांच्या घरगुती गणपतीचे विसर्जनाची तयारी सुरु असताना, उल्हासनगरमधून एक धक्कादायक व दु:खद बातमी समोर येत आहे. उल्हासनगरमध्ये एका कंपनीत स्फोट झाल्यामुळं चार ते पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. (Company explosion in Ulhasnagar; Three to four workers died and the number of injured)

    बचावकार्य सुरु…

    दरम्यान, उल्हासनगरमधील सेंच्युरी कंपनीत स्फोट झाला आहे. स्फोटात ४ ते ५ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी उल्हासनगर पलिकेचं अग्निशमन दल तसेच पोलीस प्रशासन दाखल झालं असून, बचाव कार्य सुरु आहे. या स्फोटात अनेक कामगार जखमी झाल्याचं बोललं जातंय.

    (बातमी अपडेट होत आहे)