Compassionate waiting for job for 10 years, Zilla Parishad alleges discrimination

२८ सप्टेंबर २०१८ च्या ग्राम विकास विभागाच्या (Village Development Department) पत्रानुसार निघणाऱ्या पदभरतीत १० टक्के जागा अनुकंपा उमेदवारांतून भरण्यात याव्या, असा उल्लेख असताना देखील जिल्हा परिषद (Zilla Parishad) त्याकडे डोळेझाक करत आहे.

    गोंदिया : जिल्ह्यातील अनुकंपाधारक (Compassionate in the district) १० वर्षांपासून प्रतिक्षासुचीनुसार अनुकंपा पदभरती करीता जिल्हा परिषदेत शैक्षणिक अर्हतेनुसार (Educational qualification in Zilla Parishad) नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकदा आंदोलन झाल्यानंतर आता कुठे भरती करकण्यात येत आहे. फक्त काहीच जणांना नोकरीत समाविष्ट करण्यात आले असून इतर उमेदवार अद्यापही प्रतीक्षेतच आहेत.

    अनुकंपा धारकांच्या कागदपत्रांची पडताळणी (Verification of documents) जिल्हा परिषदेने जानेवारी २०१९ मध्ये केली. परंतु, अद्यापही अनुकंपा अंतर्गत नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे अनुकंपा धारकांना नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अनुकंपा यादीत असलेले उमेदवार वयाच्या ४५ वर्षापर्यंत पोहोचले आहेत. ४५ वय पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील नोकरीत घेतले जात नाही.

    २८ सप्टेंबर २०१८ च्या ग्राम विकास विभागाच्या (Village Development Department) पत्रानुसार निघणाऱ्या पदभरतीत १० टक्के जागा अनुकंपा उमेदवारांतून भरण्यात यावे, असा उल्लेख असताना देखील जिल्हा परिषद (Zilla Parishad) त्याकडे डोळेझाक करत आहे. ग्राम विकास विभागाच्या ६ जुलै २०१९ च्या पत्रानुसार एकूण रुक्त पदांच्या अधीन राहून पदभरती करण्यात येत नसल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

    विविध कारणे पुढे करून जिल्हा परिषद अनुकंपा धारकांना नोकरी पासून वंचीत ठेवण्याचे काम करत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला. राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी अनुकंपा धारकांना नोकरीत समाविष्ट केले. परंतु, गोंदिया जिल्ह्यात (Gondia District) मात्र कारणे सांगून भरती करण्यात येत नाही, असा आरोप अनुकंपा धारकांनी केला आहे.