vidhan parishad

भाजपने आमदारांना (BJP MLA) दोन दिवस ताज हॉटेलचा (Taj Hotel) पाहुणचार घडविण्याचे निश्चित केले आहे. याची पूर्ण जबाबदारी आमदार आशीष शेलार, गिरीश महाजन आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (MLA Ashish Shelar, Girish Mahajan and Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar) यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ आहे, मात्र खरी लढत भाजप व काँग्रेसमध्ये होणार आहे, त्यामुळं एक एक मत महत्वाचं आहे.

  मुंबई : नुकत्याच राज्यसभा निवडणुका (Rajya sabha election) झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) रणनिती आखयाला तसेच मतांची जुळवाजुळव करण्याची तयारी सुरु झाली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरल्याने 20 जूनला निवडणुकीचा (MLC Election on 20 June 2022) आखाडा रंगणार आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार असून क्रॉस व्होटिंग (Cross Voting) तसेच घोडबाजार किंवा दगाफटका होऊ नये, यासाठी सर्वंच पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.

  भाजपने आमदारांना (BJP MLA) दोन दिवस ताज हॉटेलचा (Taj Hotel) पाहुणचार घडविण्याचे निश्चित केले आहे. याची पूर्ण जबाबदारी आमदार आशीष शेलार, गिरीश महाजन आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (MLA Ashish Shelar, Girish Mahajan and Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar) यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ आहे, मात्र खरी लढत भाजप व काँग्रेसमध्ये होणार आहे, त्यामुळं एक एक मत महत्वाचं आहे.

  दरम्यान, भाजपचे नेते चमत्काराची भाषा करीत असले तरी, प्रत्यक्ष आकडेवारी बघता त्यांचा पाचव्या जागेवरील विजय कठीण दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपचे नेते रणनीतीवर लक्ष केंद्रित करीत होते. यावेळी ते विजयाचे दावे-प्रतिदावे करत आहेत. लहान पक्ष आणि अपक्षांच्या मतांना याहीवेळी प्रचंड महत्त्व आले असले तरी, गुप्त मतदानाचा फायदा घेत मोठ्या पक्षांच्या मतांतही भाजपला फोडाफोडी करावी लागणार, अशी स्थिती आहे. लहान पक्ष आणि अपक्षांची तब्बल २९ मते आहेत. तर मविआकडून मतदानाचे अचूक व्यवस्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे. काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांच्यासाठी काँग्रेस व मविआला अपक्षांना मनधरणी करावी लागणार आहे. तसेच भाजप व काँग्रेसमध्ये मतांसाठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ आहे, मात्र खरी लढत भाजप व काँग्रेसमध्ये होणार आहे, त्यामुळं एक एक मत महत्वाचं आहे.

  काय आहे सध्याचे समीकरण?

  शिवेसना

  स्वत:ची मते     ५५
  अपक्षांची मते     ७
  एकूण     ६२

  राष्ट्रवादी
  स्वत:ची मते     ५१
  अपक्षांची मते     ४
  एकूण     ५५

  काँग्रेस
  स्वत:ची मते     ४४
  अपक्षांची मते     ००
  एकूण     ४४
  दोन जागांसाठी मते हवी     ८

  भाजप 
  स्वत:ची मते     १०६
  अपक्षांची मते     ६
  एकूण     ११२
  राज्यसभा निवडणुकीत मिळालेली मते     १२३
  पाचवी जागा निवडून आणण्यासाठीची मते     १३०