मुख्यमंत्री शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल; दौरा वादाच्या भोवऱ्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर शहरात आले होते. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांना शिंदेंनी हजेरी लावली. संभाजीनगर दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रात्री १० नंतर लाऊड स्पीकरवरून भाषण केले आहे.

    संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दोन दिवसांपूर्वीच संभाजीनगरचा (Sambhaji Nagar) दौरा केला होता. हा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला असून मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल (Complaint Filed) करण्यात यावा यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर शहरात आले होते. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांना शिंदेंनी हजेरी लावली. संभाजीनगर दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यासमोर रात्री १० नंतर लाऊड स्पीकरवरून भाषण (Speeach From Loud Speaker At Night) केले आहे.

    आनंद कस्तुरे यांनी याप्रकरणी क्रांती चौक (Kranti Chowk) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री १० वाजेनंतर लाऊडस्पीकर लाऊन भाषण करण्यास मनाई असताना भाषण केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.