संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

या गोंधळाचा परिस्थितीबाबत लोकप्रिय स्थानकांच्या नावांमध्ये सुधारणा करावी किंवा एमएमआरडीएने किमान लोकप्रिय नावांचा कंसात उल्लेख करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत आला आहे.

    मुंबई- मुंबईकरांचा (Mumbai) प्रवास अधिक सुखकर व जलदगतीने व्हावा यासाठी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो 2A (Metro 2A) आणि मेटो 7 (Metro 7) या मार्गाचे उद्घाटन केले. मात्र दोन्ही मार्गावरील स्थानकांची नावे सारखीच असल्यानं मुंबईकर संभ्रमात पडले असून, यामुळं गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, स्थानकांना ज्या पद्धतीने नाव देण्यात आले आहे त्याबद्दल संभ्रम होत असून प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दहिसर मेट्रो पूर्व, अप्पर दहिसर, लोअर मालाड आणि मालाड पश्चिम; तर ओशिवरा व अप्पर ओशिवरा यांसारख्याच स्थानकांच्या नावाने प्रवाशांचा गोंधळ उडत असून, अपेक्षित स्थानकावर उतरण्याऐवजी स्थानकांच्या नावामुळं घोळ होत असल्याचं प्रवाशांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, या गोंधळाचा परिस्थितीबाबत लोकप्रिय स्थानकांच्या नावांमध्ये सुधारणा करावी किंवा एमएमआरडीएने किमान लोकप्रिय नावांचा कंसात उल्लेख करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत आला आहे; मात्र यापैकी मेट्रो २ अ मार्गावरील स्थानकांची नावे समान असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या स्थानकांना भौगोलिक वैशिष्ट्यानुसार नावे देण्यात यावीत, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

    दरम्यान, एमएमआरडीएने मेट्रो १ मार्गावरील जे. बी. नगर मेट्रो स्टेशनला चकाला असे नाव देताना असाच विचार केला होता. मात्र, प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आता या स्थानकाचे नाव जे.बी.नगर/चकाला असे नाव दिले आहे. दहिसर मेट्रो पूर्व, अप्पर दहिसर, लोअर मालाड आणि मालाड पश्चिम; तर ओशिवरा व अप्पर ओशिवरा यांसारख्याच स्थानकांच्या नावाने प्रवाशांचा गोंधळ उडेल, असे वॉचडॉग फाउंडेशनने निदर्शनास आणून दिले आहे. मेट्रो मार्ग २ अ मार्गिकेवर तीन मेट्रो स्थानकांना अप्पर दहिसर, लोअर मालाड आणि लोअर ओशिवरा अशी नावे दिली आहेत. जी पूर्णपणे गोंधळात टाकणारी नावे आहेत.