‘द्रुतगती’ वरील कोंडी  35 तासांनी सुरळीत! सलग सुट्ट्यांमुळे गर्दी; इंजिन गरम हाेऊन वाहने पडली बंद

 मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवर रविवारी वाहनचालाकंना वाहतूक काेंडीचा सामना करावा लागला. तब्बल तीस ते पस्तीस तासानंतर  वाहतूक काेंडी साेडवण्यात पोलिसांना यश आले. बोरघाटामधील वाहतूक कोंडी 35 तासानंतर फोडण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे. वाहतूक कोंडी सुटल्याने वाहन चालकांनी देखील सुटकेचा निःश्वास टाकला. 

  पिंपरी :  मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवर रविवारी वाहनचालाकंना वाहतूक काेंडीचा सामना करावा लागला. तब्बल तीस ते पस्तीस तासानंतर  वाहतूक काेंडी साेडवण्यात पोलिसांना यश आले. बोरघाटामधील वाहतूक कोंडी 35 तासानंतर फोडण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे. वाहतूक कोंडी सुटल्याने वाहन चालकांनी देखील सुटकेचा निःश्वास टाकला.

  रायगड महामार्ग पोलिसांकडून मुंबईहून पुण्याला येणारी लेन आणि पुण्याहून मुंबईला जाणारी लेन या दोन्हीही लेनवर मुंबई कडून येणारी वाहतूक सुरू केल्याने बोरघाटातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आली.

  रायगड महामार्ग पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले. यामुळे महामार्गावरीलवाहतूक कोंडी सोडवण्यात महामार्ग पोलिसांना यश आले. या वाहतूक कोंडीत पोलीस प्रशासनाची देखील चांगलीच कसरत झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक पोलिसांनी तासनतास उभे राहून वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे कोंडी सुटण्यास मोठी मदत झाली.

  मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर शनिवारी सकाळपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी ही रात्री आणि रविवारी सकाळी देखील कायमहोती. अडोशी टनेलच्या आधीपासून ते अमृतांजन पुलापर्यंत तर पुण्याच्या दिशेला खंडाळाकडे रात्री १० किमी पर्यंत वाहनांच्या रांगालागल्या होत्या. तर रविवारी सकाळी हि मोठी रांग लागली होती.

  जुन्या मार्गावर खोपोली हद्दीत बोरघाटात अनेक वाहने बंद पडल्याने तर वाहतूक कोंडीत मोठी भर पडली.नाताळ  आणि विकेंडमुळे सलग तीन दिवस शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळा, कोकण तसेच गोवा या पर्यटन स्थळी जात असल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सकाळ पासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळपासून मार्गावर चार ते पाच किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, ही कोंडी संध्याकाळ नंतर आणखीनच वाढली.

  मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात शनिवारी रात्री १० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात रखडली.  जुन्या मुंबई पुणेमार्गांवर देखील हीच परिस्थिती होती. शिंग्रोबाच्या अलीकडे पासून रस्त्यातच वाहने बंद पडली हाेती. या वाहतूक कोंडीत महिला, लहान मुले अडकून पडल्याने अनेक नागरीक हे कंटाळून रस्त्यावर येऊन बसले होते. काही प्रवासी तर टोविंग वॅन, मेकॅनिकच्या प्रतीक्षेत महामार्गावरच उभे होते.

  पर्यटकांमुळे वाहनांची संख्या वाढली

  शनिवार व रविवारला जोडून तसेच ख्रिसमस सुट्टी आल्याने सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. शनिवारी सकाळपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी होती. पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोल नाका व खंडाळा घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. खंडाळा घाटात अनेक वाहने गरम होऊन बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली होती.