शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन, आणि पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

दहावीच्या या निकालानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी टिव्ट करत सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे (Student, parents and teacher) अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या टिव्टमध्ये “प्रिय विद्यार्थी मित्र/मैत्रिणींनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमिक शालांत (Maharashtra SSC Result 2022) प्रमाणपत्र (इ.१०) मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे खूप खूप अभिनंदन!” अशा शुभेच्छा शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत.

    मुंबई : अनेक दिवसांपासून विद्यार्थी व पालक (Students and parents) ज्या दिवसांची वाट पाहत होते, तो दिवस आज उजाडला. आज राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. (Maharashtra SSC Result 2022) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल (SSC Result) 96.94 टक्के लागला आहे. यात कोकण विभाग (Kokan division) अव्वल आला असून, नाशिक (Nashik division) विभाग सर्वात मागे राहिला आहे. कोकण विभागाचा यंदाचा निकाल 99.27 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण 96.06 टक्के इतके आहे. अर्थात परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळं यावर्षी सुद्धा पोरांपेक्षा पोरीच हुश्शार असं म्हणावे लागेल. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुलींनीच बाजी मारली आहे.

    दरम्यान, दहावीच्या या निकालानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी टिव्ट करत सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे (Student, parents and teacher) अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या टिव्टमध्ये “प्रिय विद्यार्थी मित्र/मैत्रिणींनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमिक शालांत (Maharashtra SSC Result 2022) प्रमाणपत्र (इ.१०) मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे खूप खूप अभिनंदन!” अशा शुभेच्छा शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत.

    दहावीचा विभागवार निकाल

    १) पुणे 96.96

    २) नागपूर 97.00

    ३) औरंगाबाद 96.33

    ४) मुंबई 96.94

    ५) कोल्हापूर 98.50

    ६) अमरावती 96.81

    ७) नाशिक 95.90

    ९) लातूर 97.27

    १०) कोकण 99.27

    ऑनलाईन निकाल कसा पाहाल

    दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे.