राज्यसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा सल्ला!

    महाविकास आघाडी(MVA) सोबत असणाऱ्या अपक्ष उमेदवारांच्या जोरावर दोन उमेदवार निवडून आणण्याची रणनीती आखणाऱ्या शिवसेने(Shivsena) ला भाजप(BJP)ने धक्का दिला आहे. शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) पराभूत झाले असून भाजप उमेदवार धनंजय महाडिक (Dhanajay Mahadik) विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतानाच काँग्रेस(Congress)ने महाविकास आघाडी (MVA)ला सल्ला (Advice) दिला आहे.

    राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून आता चर्चा, वाद आणि आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियूष गोयल, डॉ. अनिल बोंडे हे विजयी झाले असून सहाव्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला आहे. यावेळी झालेल्या मतदानावरून चर्चांना उधाण आले आहे.

    काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी लगान चित्रपटाचे उदाहरण देत भाजपच्या उमेदवाराला मतदान केलेल्या आमदारांना टोला लगावला आहे. ‘राज्यसभा निवडणुकीत दिसून आलेले लगान चित्रपटातील लाखा कोण आहेत, हे महाविकास आघाडी सरकारने विधान परिषद निवडणुकीआगोदर तात्काळ शोधून काढावे’, असे ट्वीट केले आहे.