लोकसभेसाठी काँग्रेसचीही तयारी; नाशिकमधून पानगव्हाणे, बच्छाव इच्छुक

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी करत असताना कॉग्रेसही त्यात मागे राहिलेली नाही. नाशिक लोकसभेसाठी प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजीमंत्री शोभाताई बच्छाव या दोघांबरोबरच दिंडोरीसाठी रमेश कहांडळ व काशिराम बहिरम अशा चौघांनी नावे पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नाथल यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.

  नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी करत असताना कॉग्रेसही त्यात मागे राहिलेली नाही. नाशिक लोकसभेसाठी प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री शोभा बच्छाव या दोघांबरोबरच दिंडोरीसाठी रमेश कहांडळ व काशिराम बहिरम अशा चौघांनी नावे पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नाथल यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.

  दोन दिवसांपूर्वी मुंबईत प्रभारी रमेश चेन्नाथल यांनी लोकसभा निवडणूकीच्या तयारीच्या दृष्टीने राज्य कार्यकारिणी व जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन त्यात निवडणूकीला सामोरे जाण्याची तयारी करण्याच्या सूचना केल्या. इंडिया आघाडीत लवकरच जागा वाटपाबाबत बोलणी सुरू असली तरी, पक्ष पातळीवर देखील काँग्रेसची तयारी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर प्रत्येक जिल्हाध्यक्षांकडून जिल्हा निहाय व मतदार संघनिहाय आढावी घेण्यात आला. सध्याची मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, महत्वाचे प्रश्न जाणून घेण्यात आले. जिल्ह्याचा आढावा जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी सादर केला.

  त्यात त्यांनी नाशिक लोकसभा मतदार संघासाठी प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ पानगव्हाणे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावाची तसेच दिंडोरी मतदार संघातून माजी खासदार स्व. झेड. एम. कहांडळ यांचे पुत्र रमेश कहांडळ, माजी आमदार काशिराम बहिरम यांच्या नावाची शिफारस केली. पक्षाने आदेश दिल्यास आपण निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी तयार असल्याचे राजाभाऊ पानगव्हाणे यांनी सांगितले.

  लवकरच त्यादृष्टीने नियोजन

  पक्षाच्या बैठकीत लोकसभा निवडणूकीची चर्चा करण्याबरोबरच विभागीय व जिल्हा पातळीवर बैठका घेण्याच्या सूचना प्रदेश प्रभारींनी दिल्या आहेत. लवकरच त्यादृष्टीने नियोजन केले जाणार आहे.

  – राजाराम पानगव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष