file photo
file photo

राहुल गांधी (Rahul Gandhi) मशाल घेऊन नांदेडमध्ये दाखल होणार आहे. ही यात्रा 14 दिवस महाराष्ट्रात मुक्कामी असेल.

    नांदेड : दोन महिन्यापुर्वी सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra)आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे.  राहुल गांधी (Rahul Gandhi) मशाल घेऊन नांदेडमध्ये दाखल होणार आहे. ही यात्रा 14 दिवस महाराष्ट्रात मुक्कामी असेल. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेली ही यात्रा नुकतीच हैदराबाद येथे पोहोचली होती.

    आज रात्री राहुल गांधी देगलूर वन्नाळी ( प्रसिद्ध गुरुद्वारा ) अशी मशाल यात्रा करणार आहेत. हे नऊ किमीचं अंतर असेल. रात्री साडेबारापर्यंत तिथली पूजाअर्चा करुन परत येताना देगलूरला राहुल गांधी कारने येणार आहेत. आठ तारखेला सकाळी पुन्हा कारने वन्नाळीला जाणार आहेत. तेथून यात्रा पुन्हा सुरु होणार आहे. रात्रीचा मुक्काम शंकरनगरला असेल , त्याआधी गोपाळा गावात कॅार्नर मीटिंग होणार आहे. दहा तारखेला होणाऱ्या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नांदेडमध्ये येणार आहेत. त्याशिवाय या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही दहा तारखेला यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.