
काही लोक कॉंग्रेस मुक्त भारत करायच म्हणतात. पण कॉंग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही आहेत, पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल.
पुणे – काही लोक कॉंग्रेस मुक्त भारत करायच म्हणतात. पण कॉंग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही आहेत, पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल. असे मत शदर पवार यांनी व्यक्त केले. ते पुण्यातील काँग्रेस भवनच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
मी सर्वात आधी 1958 ला या कॉंग्रेस भवनमधे आलो. आज अनेक वर्षांनी कॉंग्रेस भवनमधे आलोय. त्यादकाळी कॉंग्रेसमधे अनेक नेते कार्यरत होते. पुणे म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजे पुणे असे समीकरण होते. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसचे केंद्र इथे होते. महाराष्ट्र प्रदेशचा कारभार या वास्तूतुन चालायचा. इथुन कॉंग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंना कन्व्हीन्स केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामधे पुण्यातील कॉंग्रेस भवनचे योगदान मोठे आहे.
काही लोक कॉंग्रेस मुक्त भारत करायच म्हणतात. पण कॉंग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही आहेत, पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल. आत्ताचे सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करतायत, त्यांच्याशी एकजुटीने लढावे लागेल.
“आता आरक्षण-आरक्षण बस झालं, जोपर्यंत…”
शरद पवार म्हणाले, “संभाजी ब्रिगेडने आरक्षणासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या. आता आरक्षण-आरक्षण बस झालं, जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकारण बदलत नाही, तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही,” असं विधान शरद पवारांनी केलं. आज मराठा म्हणलं की वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. काही लोक वेगळ्या दृष्टीने चर्चा करतात. मराठा म्हणताना मराठी माणूस लढाऊ माणूस असं चित्र होतं. मराठा समाजाचे वैशिष्ट्ये हे आहे की, समाजाची उन्नती कशी होईल? असा विचार मराठा समाज करत असतो.