उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दत्तक गावात काँग्रेसचा झेंडा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात मात्र काँग्रेसचा विजय झाला आहे. त्यामुळे या पराभवाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

    मुंबई – राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक सरपंच व सदस्य निवडून आले असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात मात्र काँग्रेसचा विजय झाला आहे. त्यामुळे या पराभवाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे रवी खंबालकर यांनी भाजपच्या सुरेश लंगडे यांचा पराभव केला.


    केशव उपाध्ये म्हणाले, “भाजपाचे प्रचंड यश. आतापर्यंत आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपाची जोरदार मुंसडी. इतर तीन पक्ष मिळूनही भाजपा इतकी संख्या होत नाही. निकाल अजून येत आहेत तरी भाजपा नंबर १ आहे. भाजपाला १२०४, उद्धव ठाकरे गटाला १२४, काँग्रेसला ९५ आणि राष्ट्रवादीला १६१ ठिकाणी यश मिळालं.”