‘अग्निपथ’ विरोधात काँग्रेसने तरुणांना भडकवले; रामदास आठवले यांचा आरोप

अग्निपथ विरोधात काँग्रेसने तरुणांना भडकावले असा गंभीर आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या अग्रिपथ योजनेविरोधात देशभरात तरुणांकडून हिंसक आंदोलन केलं जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अग्निपथ योजनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

    अमरावती : मोदी सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला तरुणांकडून हिंसक विरोध होत आहे. अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलक विद्यार्थी आणि तरुणांकडून एक्सप्रेस गाड्या आणि भाजप कार्यलयाला आग लावली आहे. या योजनेवरून आंदोलक विद्यार्थी आणि तरुण चांगलेच आक्रमक झाले आहेत.

    दरम्यान या आंदोलनवरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अग्निपथ विरोधात काँग्रेसने तरुणांना भडकावले असा गंभीर आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या अग्रिपथ योजनेविरोधात देशभरात तरुणांकडून हिंसक आंदोलन केलं जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अग्निपथ योजनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

    आठवले म्हणाले, ‘अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसने तरुणांना भडकावले आहे. आंदोलक तरुणांना शांत करणे आवश्यक आहे. मात्र विरोधक त्यांना भडकावत आहे. यात काँग्रेसचा मोठा हात आहे’. सरकार चर्चा करायला तयार आहे. सरकार चर्चा करायला तयार आहे. चर्चेतून मार्ग निघतो. त्यामुळे तरुणांनी चर्चेस पुढं यावं असं, आवाहनही देखील आठवले यांनी केले.

    दरम्यान, आठवले यांनी आगामी निवडणुकीवर देखील भाष्य केलं. आठवले म्हणाले, ‘विदर्भातील सर्वाधिक दलित मतांची संख्या आहे. त्यामुळे या ठिकाणी आमचा रिपब्लिकन पक्ष हा पक्षबांधणी करत आहे. आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप सोबतच युती करून निवडणूक लढवली जाईल, अशी माहिती रामदास आठवले यांनी अमरावतीत दिली. तसेच आगामी निवडणुकीत भाजपने आम्हाला सत्तेची बरोबर भागीदारी द्यावी, आम्हाला सत्तेत मोठा वाटा हवा, अशी मागणी देखील रामदास आठवले यांनी केली.