अशोक चव्हाणांनी दिली नवनीत राणा यांना कॉंग्रेसची खुली ऑफर;  म्हणाले…

कॉंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी इंडिया आघाडीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे संकेत देत खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये येण्याचे सुचवले आहे.

    अमरावती : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha Elections 2024) सर्व पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान विरोधकांनी मोदींविरुद्ध (PM Narendra Modi) आघाडी तयार करत इंडिया आघाडीची (INDIA Alliance) निर्मिती केली आहे. कॉंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी इंडिया आघाडीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे संकेत देत खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये येण्याचे सुचवले आहे.

    अमरावतीमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला असून इंडिया आघाडीबाबत विश्वास व्यक्त केला. चव्हाण म्हणाले, इंडिया आघाडी दररोज मजबूत होत आहे. त्यामुळे भाजपकडून फक्त संभ्रम निर्माण केला जात आहे आणि यासाठी वेगवेगळ्या खेळी त्यांच्याकडून खेळल्या जात आहेत. त्याला फार महत्व देण्याची गरज नाही. असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच विरोधकांवर एजन्सीकडून सुरु असलेल्या कारवाईवर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, देशात सर्वत्र या गोष्टी सुरू आहेत. जशा जशा निवडणुका येतील, तशा तशा या अनेक गोष्टी वाढणार आहेत. असे मत त्यांनी मांडले.

    अशोक चव्हाण यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कॉंग्रेसमध्ये पुन्हा येण्याची ऑफर दिली. महाविकास आघाडी मधील अन्य पक्षांवर मी बोलणार नाही पण त्यांनी काँग्रेसला विचारत घेतलं पाहिजे. नवनीत राणा आमच्या सोबत निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये उडी घेतली. रवी राणांची काय अवस्था झाली आहे? हे लोकांना माहीत आहे. अशी टिप्पणी अशोक चव्हाण यांनी केली. तसेच प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेतलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे आधी त्यांनी महाविकास आघाडी मध्ये यावं. नंतर राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. असा विश्वास देखील अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.