बैठक संपली; सरकार स्थिर असल्याचा बाळासाहेब थोरातांचा दावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. एकूण १३ प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. या प्रस्तावावर चर्चा झाली आहे.

    मुंबई : शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी पुकारलेले बंड (Rebellion) यशस्वी होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीची बैठक (MVA Meeting) पार पडली आहे. पण, या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यानंतर सरकार स्थिर (Government Stable) असल्याचा दावा काँग्रेसचे (Congress) मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे. तर, अजित पवार (Ajit Pawar) यांनीही सरकार सुरू असल्याचे सांगितले.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. एकूण १३ प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. तर, ‘काही ही झालं नाही. मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे आले आणि बैठक झाली. तुम्ही चुकीच्या बातम्या करतात. आमदार शिवसेनेचे गेले, सरकार सध्या सुरू आहे, अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

    बैठकीआधी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याची माहिती दिली पण नंतर त्यांनी शब्द फिरवला. नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या बैठकीला प्रत्यक्षपणे हजर राहू शकले नाहीत, ऑनलाईनच (Online) हजर होते. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेदेखील (Aaditya Thackeray) अनुपस्थित असून त्यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपले पद काढल्याचे दिसून येते.