जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट

यावेळी त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधत शेती- घरे- अंतर्गत पुलं यांच्या नुकसानी संदर्भात घेतली. तसेच 50 हजार रुपये हेक्‍टर नुकसान भरपाई द्या अशी शासनाकडे मागणी करणार असल्याचे मत व्यक्त केले.

    चंद्रपूर : गेल्या आठवठाभर चंद्रपूर जिल्ह्यात चांगलाच पाऊस झाला. या पावसाने राजुरा तालुक्यातील वर्धा नदीला पुर आल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना  भेट दिली. यावेळी त्यांनी पुराने प्रभावित झालेल्या शेतकऱ्याशी साधला संवाद.

    पावसामुळे धानोरा, चिंचोली, कविठपेठ, विरुर स्टेश या गावांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.  तर, राजुरा तालुक्यातील अनेक गाव वर्धा नदीच्या पुराने प्रभावित झाली आहेत. या गावांना काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधत शेती- घरे- अंतर्गत पुलं यांच्या नुकसानी संदर्भात घेतली. तसेच 50 हजार रुपये हेक्‍टर नुकसान भरपाई द्या अशी शासनाकडे मागणी करणार असल्याचे मत व्यक्त केले. तर राज्य शासनाने तातडीने नुकसान भरपाई बाबत निर्णय घेण्याचे केले आवाहनही केेले.