कॅग रिपोर्टवरून कॉंग्रेसचा मोठा गौप्यस्फोट, गडकरींचा अंतर्गत काटा काढण्यासाठी कॅगचा अहवाल, जाणून घ्या काय म्हणाले कॉंग्रेसचेन नेते

    Cag Report 2023 : कॅग रिपोर्टवरून आता कॉंग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला घेरत हा नितीन गडकरी यांनाच बाजूला करण्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे. एक्स्प्रेस वेच्या बांधकामासाठी अंदाजापेक्षा जास्त खर्च झाल्याचा दावा ऑडिट रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. हे वृत्त येताच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेराव घालण्यास सुरुवात केली. आता सरकारचे उत्तर आले आहे. कॅगचा हा दावा अयोग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

    कॅगच्या अहवालातून सत्य समोर

    खरंतर दिल्ली ते गुरुग्रामला जोडण्यासाठी द्वारका एक्सप्रेस वे बनवला जात आहे. कॅगने त्याच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, कॅगच्या अहवालातून जे समोर आले आहे. खरतरं काँग्रेसचे सरकार केंद्रात होते. तेव्हा आम्हाला बदनाम केले. आता हा अहवाल दोन गोष्टींसाठी महत्वाचा वाटतो. पहिली म्हणजे, नितीन गडकरींचा अंतर्गत काटा काढायचा आहे. ही त्यांची पार्श्वभूमी असू शकते.
    नितीन गडकरींना बाजूला करण्याचा दृष्टिकोन
    प्रत्येक विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार असताना कॅगनी केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. गडकरींच्या बाबतीत सगळेच सांगतात की स्वच्छ प्रतिमा आहे. विकासाच्या बाबतीत ते त्यांची प्रतिमा चांगली आहे. यातून त्यांना बाजूला करण्याचा दृष्टिकोन दिसतो, असे वडेट्टीवार म्हणाले.

    रस्ते व महामार्ग समितीचे अध्यक्ष पंतप्रधान
    दुसरी गोष्टी अशी आहे की, रस्ते व महामार्ग समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात तर त्यांची भूमिका काय आहे? आता समोर आलेल्या अहवालावर केंद्र सरकार काय कारवाई करते, याकडे आमचे लक्ष आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

     कॅगच्या अहवालात काय म्हटले?

    कॅगच्या अहवालानुसार, 29.06 किलोमीटर लांबीच्या एक्स्प्रेस वेला कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) कडून निश्चितच मंजुरी मिळाली होती, परंतु 18.20 कोटी प्रति किलोमीटर बजेटसह. मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून त्याचे एकूण बजेट 7287.29 कोटी रुपये करण्यात आले. म्हणजेच 18.20 कोटींऐवजी प्रत्येक किलोमीटरवर सुमारे 251 कोटी रुपये खर्च झाले आहेत.