
भाजपने ट्विट केलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा 'मी पुन्हा येईन या व्हिडिओने काहीतरी शिजत असल्याची शंका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केली.
नागपूर : भाजपने ट्विट केलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘मी पुन्हा येईन या व्हिडिओने काहीतरी शिजत असल्याची शंका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केली. पत्रकारांसोबत बोलताना वडेट्टीवार यांनी हे ट्विट चुकून किंवा सहज केल्याचे वाटत नाही. येण्याची पुन्हा खात्री पटल्याने नंतर ते ट्विट डिलीट केले असावे, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणावर बोलताना यापूर्वीही राज्य सरकारने घेतलेला निर्णय केंद्राला विचारून घेतला नव्हता. आरक्षणावरून स्थिती चिघळत असताना केंद्राने त्यात हस्तक्षेप करणे अपेक्षित आहे. केंद्र सरकार त्यासाठी नकार देत आहे. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. आरक्षण देण्याची त्यांची ऐपत नसल्याने राज्य सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, राज्याला अधिकार नसताना त्यांनी कुठल्या भरवशावर मराठ्यांना शब्द दिला. जरांगे पाटील यांनी 40 दिवस सरकारवर विश्वास का ठेवला, असा सवाल करत वडेट्टीवार यांनी राज्य सरकार या काळात केंद्रात गेले नाही आणि मुदत संपल्यावर गेले. आता साप गेल्यावर लाठ्या मारल्या जात आहे, अशी नाराजी व्यक्त केली.