काँग्रेस आमदार अमित देशमुख भाजपच्या वाटेवर?; ‘या’ नेत्यांच्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, कोण आहे नेता?

अमित देशमुख (Amit Deshmukh) हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण मागील काही दिवसांपासून काँग्रेसला गळती लागली आहे.

    लातूर राज्याच्या राजकीय क्षेतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तसेच काँग्रेससाठी (Congress) धक्का देणारी तर भाजपासाठी पक्ष वाढीसाठी महत्वाची बातमी येत आहे. लातूरचे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण मागील काही दिवसांपासून काँग्रेसला गळती लागली आहे. तर भाजपामध्ये इंनकमिंग सुरु आहे. त्यामुळं अमित देशमुख काँग्रेसला धक्का देणार का, याची उत्सुकता आहे.

    काँग्रेसला धक्का…

    दरम्यान, आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. या विधानानंतर लातूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. निलंगेकर यांच्या या वक्तव्यानं लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच भाजपाच्या गळाला अमित देशमुख लागणार का, हे पाहवे लागणार आहे.

    निलंगेकर यांनी नेमके काय म्हटले

    निलंगेकर यांच्या वक्तव्याने लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा निलंगेकर यांनी केला आहे. ते भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात बोलत होते. निलंगेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निलंगेकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आहे. जरी अमित देशमुख हे भाजपमध्ये येण्यास इच्छूक असले तरी मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही. असं निलंगेकर म्हणालेत.