काँग्रेस आमदारांना तातडीनं मुंबईला पोहोचण्याचे आदेश, एच. के. पाटलांच्या नेतृत्त्वात सायंकाळी काँग्रेसची बैठक

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Shivsena, NCP and Congress Meeting) बैठकीनंतर आता सांयकाळी काँग्रेसची सुद्धा बैठक होणार आहे. एच. के. पाटलांच्या (H K Patil) नेतृत्त्वात सायंकाळी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्यातील काँग्रेस आमदारांना तातडीने मुंबईला (Congress MLA Mumbai) रवाना होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, आम्ही तुमच्यासोबत आहोत असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटलं आहे. आजच्या काँग्रेसच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारमध्ये राहयचे की नाही यावर चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले होते. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांमध्ये अंत्यत चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान, भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर आता ठाकरे सरकारला धक्के बसायला सुरुवात झाली आहे. तसेच मविआमध्ये चलबिचलता तसेच सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह (13 MLA)  नॉट रिचेबल आहेत. शिंदे हे गुजरातमधील सुरत (Gujrat surat) येथे एका हॉटेलमध्ये आहेत. या सर्व पाशर्वभूमीवर शिवसेनेतून १३ पेक्षा जास्त आमदार फुटू शकतात. व ते भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देऊ शकतात असं बोललं जात आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, दिल्लीत शरद पवार व देवेंद्र फडणवीस (Sharad Pawar and Devendra fadnvis) हे आहेत. तर राज्यात सुद्धा बैठकीचं सत्र सुरु आहे.

    आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Shivsena, NCP and Congress Meeting) बैठकीनंतर आता सांयकाळी काँग्रेसची सुद्धा बैठक होणार आहे. एच. के. पाटलांच्या (H K Patil) नेतृत्त्वात सायंकाळी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्यातील काँग्रेस आमदारांना तातडीने मुंबईला (Congress MLA Mumbai) रवाना होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, आम्ही तुमच्यासोबत आहोत असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटलं आहे. आजच्या काँग्रेसच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारमध्ये राहयचे की नाही यावर चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.