प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांना काँग्रेसची नोटीस; शिस्तपालन समितीने उत्तरासाठी दिला आठवडा

शहर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने जिचकार यांच्याविरुद्ध पक्ष शिस्तभंगाची कारवाई करुन त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करावे. तसेच पक्षातून कायमची हकालपट्टी करावी, असा केला. प्रदेश काँग्रेस शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवला होता.

    नागपूर : काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठकीत झालेल्या ‘राडा’प्रकरणी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार (Narendra Jichakar) यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल व गैरवर्तणूकीबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. समितीचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी जिचकार यांना आठवडाभरात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

    शहर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने जिचकार यांच्याविरुद्ध पक्ष शिस्तभंगाची कारवाई करुन त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करावे. तसेच पक्षातून कायमची हकालपट्टी करावी, असा केला. प्रदेश काँग्रेस शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवला होता. प्रदेश शिस्तपालन समितीची बैठक 16 ऑक्टोबरला झाली आणि त्यात जिचकार यांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.

    नागपुरात विभागीय आढावा बैठक 12 ऑक्टोबरला झाली. यावेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याकडून माईक हिसकावण्याचा प्रयत्न जिचकारांनी केला होता. तसेच शिवीगाळही केली होती. यामुळे व्यासपीठावर गोंधळ निर्माण झाला होता. व्यासपीठावरुन अध्यक्ष खाली घसरले, असे शहर शिस्तपालन समितीने पृथ्वीराज चव्हाण यांना कळवले होते.