काँग्रेसकडून भाजपचे जगताप, टिळक यांच्या मतदानावर आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत २८५ आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून ५ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. ​राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे.

    मुंबई – विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा निकाल काय येतो याची आतुरता सर्वाना लागली आहे. विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत २८५ आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून ५ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. ​राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपने देखील या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

    लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांच्या मतदानावेळी दोन सहकारी उपस्थित होते, असा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.