काँग्रेस पक्ष देश वाचविण्याचा लढा लढत आहे सर्वांनी एकजुटीने या लढ्यात सामील व्हा – रमेश चेनीथल्ला

काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथल्ला यांनी आवाहन केले की काँग्रेस पक्ष हा देश वाचवण्याचा लढा लढत आहे आपण सर्वांनी एकजूट होऊन या लढ्यात सामील व्हा.

    मुंबई : उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर साकीनाका चांदिवली येथे संपन्न झाले. या शिबिरात दोन्ही जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्ष बळकट करण्याची शपथ घेऊन येणाऱ्या आगामी सर्व निवडणुकांमध्ये हम है तयार अशा घोषणा दिल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथल्ला यांनी आवाहन केले की काँग्रेस पक्ष हा देश वाचवण्याचा लढा लढत आहे आपण सर्वांनी एकजूट होऊन या लढ्यात सामील व्हा.

    या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथल्ला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा, सोनल पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र कम्युनिकेशन विभाग प्रभारी सुरेंद्र राजपूत, सुनील अहिरे, मुंबई कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा आणि इतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित राहून शिबिराला संबोधित करत मार्गदर्शन केले.

    यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी उपस्थित सर्व मान्यवरचे स्वागत केले, जिल्हाध्यक्ष जगदीश आमिर व अब्राहम रॉय म्हणून यांनी चैनीथल्ला यांचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई प्रदेश महासचिव प्रभाकर जावकर यांनी केले तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शरीफ खान, गणेश चव्हाण, मो.गौस शेख, शरद पवार, वजीर मुल्ला, रामगोविंद यादव यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान दिले.