संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध; पृथ्वीराज चव्हाण यांची ग्वाही

'नरेंद्र मोदी सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला असून, काँग्रेस पक्ष हा कायमच संविधानाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

    पुणे : ‘नरेंद्र मोदी सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला असून, काँग्रेस पक्ष हा कायमच संविधानाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
    पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ ‘संविधान रथ’ तयार करण्यात आला. त्याचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.