nana patole

सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेसची (Solapur Congress) विचारधारा मोठ्या प्रमाणात आहे. आपण सर्वजण एक दिलाने व एक विचाराने काम केल्यास पुन्हा कॉंग्रेस पक्षास गतवैभव प्राप्त होणार आहे. मी म्हणजे पक्ष नसून पक्ष म्हणजे मी आहे.

    पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेसची (Solapur Congress) विचारधारा मोठ्या प्रमाणात आहे. आपण सर्वजण एक दिलाने व एक विचाराने काम केल्यास पुन्हा कॉंग्रेस पक्षास गतवैभव प्राप्त होणार आहे. मी म्हणजे पक्ष नसून पक्ष म्हणजे मी आहे. अशी भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे. देशाचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपले सर्वांचे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कामकाज चालणार आहे. जे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन काम करतील त्यांनाच पुढे पक्षांमध्ये संधी मिळेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

    पंढपूर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना नाना पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ‘गट-तट निर्माण न करता एक विचाराने सर्वांनी काम करावे. जनता कॉंग्रेस पक्षाकडे आशेने पाहत आहे. आपण जनतेमध्ये जाऊन त्यांचा विश्वास संपादन करावा’. दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कर्नाटक चितापूर येथील भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड यांच्याविरुद्ध पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांना निवेदन देवून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी गुन्हा दाखल करण्याची व त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

    काँग्रेस पक्षाचा हात कार्यक्रम घरोघरी राबवणार

    पुढील काळात ग्रामीण भागामध्ये संघटना बांधणी करून गण, गटमध्ये पदाधिकारी निवड करून घरोघरी कॉंग्रेस पक्षाचा हात हा कार्यक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.