Congress youth leader Sachin Shingada appointed as chairman of Jawahar's project level committee

राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयस्तरावरील नियोजन आढावा समित्यांच्या अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून जव्हार प्रकल्पाच्या नियोजन आढावा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे युवानेते सचिन शिंगडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे(Congress youth leader Sachin Shingada appointed as chairman of Jawahar's project level committee).

    जव्हार : राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयस्तरावरील नियोजन आढावा समित्यांच्या अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून जव्हार प्रकल्पाच्या नियोजन आढावा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे युवानेते सचिन शिंगडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे(Congress youth leader Sachin Shingada appointed as chairman of Jawahar’s project level committee).

    राज्यातील आदिवासी जिल्ह्यांतील ३० आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांच्या क्षेत्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजना व कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्तरीय नियोजन व आढावा समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्यसरकारने जाहीर केला आहे. या समितीच्या माध्यमातून आदिवासी भागात राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अमलबजावणी होण्याला मदत होणार आहे.

    या महत्वाच्या समित्यांची घोषणा राज्यशासनाने केली असून जव्हार प्रकल्प कार्यालयाकरिता काँग्रेसचे युवानेते सचिन शिंगडांच्या अध्यक्षतेखाली घोषित झालेल्या समितीत वैष्णवी रहाणे, कमळाकर धूम, मधुकर चौधरी, प्रदीप वाघ, मनोज खरपडे, मृणाली नडगे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    शिंगडा यांचे वडील दिवंगत खासदार दामू शिंगडा यांनी २५ वर्षाच्या खासदार कारकीर्दीत अनेक कार्यकर्ते घडविले आहेत,सचिन शींगडा यांनी अनेक योजनेतून नागरिकांना मदत केली असून,जिल्ह्यातून युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

    आदिवासी समाजासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्नशील राहून काम करू. राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी जो विश्वास दाखवून या समितीची जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे, त्यादृष्टीने निश्चितपणे काम करु . गरीब गरजूंना योजनेच्या माध्यमातून विकासात आणू.

    सचिन शिंगडा, अध्यक्ष, प्रकल्पस्तरीय (नियोजन आढावा) समिती, जव्हार प्रकल्प