महापालिका निवडणूकीसाठी कांग्रेस’ची कोअर कमिटी…

शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने ‘कोअर कमिटी’ची स्थापना केली आहे. महापालिका निवडणुकीकरिता काँग्रेसच्या इच्छुंक उमेदवारांचे पॅनेल देखील ही 7 जणांची कमिटी तयार करणार आहे. काँग्रेसचे प्रशासन व संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांनी याबाबतचे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भाजपने केलेल्या गैरकारभाराची माहिती जन आंदोलनाद्वारे उघड करण्याकरिता शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने ‘कोअर कमिटी’ची स्थापना केली आहे. महापालिका निवडणुकीकरिता काँग्रेसच्या इच्छुंक उमेदवारांचे पॅनेल देखील ही 7 जणांची कमिटी तयार करणार आहे. काँग्रेसचे प्रशासन व संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांनी याबाबतचे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.

    शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या ‘कोअर कमिटी’च्या अध्यक्षा असतील. तर, प्रदेश उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवडचे प्रभारी संजय राठोड मुख्य समन्वयक असणार आहेत. शहराध्यक्ष कैलास कदम, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश सचिव सचिन साठे, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप पांढरकर आणि अनिरुद्ध कांबळे या समितीचे सदस्य असणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरुन या कोअर कमिटीची स्थापना केली आहे.

    पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत पक्ष बांधणीची तयारी करणे, शहर विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणे, शहरातील समस्या, प्रश्न तसेच महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने केलेल्या गैरकारभाराची माहिती जनआंदोलनाद्वारे उघड करणे, काँग्रेस पक्षाने केलेल्या विकास कामांची यादी तयार करुन जनतेसमोर ठेवणे आणि निवडणुकीकरिता काँग्रेसच्या इच्छुंक उमेदवारांचे पॅनेल तयार करण्याची जबाबदारी या 7 जणांच्या कमिटीवर असणार आहे.