राज ठाकरेंच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर; लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही

सावरकरांबद्दल बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी तरी आहे का? तसेच, राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत, असे राज ठाकरे म्हणाले होते. यानंतर काँग्रेसने राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे आमचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळणारा भरघोस, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्याचाच राज ठाकरेंवर झालेला परिणाम आणि प्रभाव त्यामुळे ते विचलित झाले आहेत, असा टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी लगावला.

    मुंबई – मुंबईमध्ये रविवारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी सावरकर, नेहरू वादावरून सुनावले. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल (Swatantrya Veer Savarkar) वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राज ठाकरे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला. त्याला मुंबई काँग्रेसच्या (Mumbai Congress) नेत्यांनी उत्तर दिले.

    सावरकरांबद्दल बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी तरी आहे का? तसेच, राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत, असे राज ठाकरे म्हणाले होते. यानंतर काँग्रेसने राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे आमचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळणारा भरघोस, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्याचाच राज ठाकरेंवर झालेला परिणाम आणि प्रभाव त्यामुळे ते विचलित झाले आहेत, असा टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी लगावला.

    एक व्यक्ती चालत संपूर्ण भारत जोडायला निघालेला आहे. त्यांना प्रत्येक राज्यात मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद, त्यांच्यासोबत सर्व क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, उद्योजक आणि सामान्य जनता स्वतःहून जोडली जात आहे. हे कदाचित राज ठाकरे यांना बघवत नाही. कारण राज ठाकरे कधी बाहेर पडले नाहीत, फिरले नाहीत. भारत तर सोडा, महाराष्ट्र ही त्यांनी संपूर्णपणे पाहिला नसेल, असा टोला भाई जगताप यांनी लगावला.

    मनसे (MNS) हा संपलेला पक्ष आहे आणि राज ठाकरे यांच्या वेळोवेळी भूमिका बदलतात. लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. राज ठाकरे यांनी इतरांच्या मेंदूविषयी बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करायला पाहिजे. त्यांनीच आता आपला मेंदू भाजप आणि मिंधे सरकारकडे गहाण ठेवलेला आहे. सुपारी घेऊन राहुल गांधी यांच्यावर टीका केलेली आहे, हे आजच्या भाषणाने दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला.