मविआ सरकारच्या काळात तुरुंगात टाकण्याचा डाव, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा गौप्यस्फोट, उद्धव ठाकरेंबाबत कटुता आहे का? या प्रश्नालाही दिलं उत्तर..

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी फोन करुन कर्टसी म्हणूनही उद्धव ठाकरेंनी कळवलं नाही, असंही फडणवीस म्हणाले. मात्र आजही उद्धव ठाकरे यांच्याबाबत कटुता नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

  मुंबई- महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Government) काळात खटले टाकण्याचं, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं ,आपल्याला जेलमध्ये (Jail) टाकण्याचं टार्गेट (Target) ठेवण्यात आलं होतं. हे टार्गेट तत्त्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे (Ex Commissioner of Police Sanjay Pandey) यांना देण्यात आलं होतं. असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केला आहे. मात्र त्यांचे प्रयत्न असफल झाले नाहीत. कसेही करुन यांना अडकवा, जेलमध्ये टाका असे आदेश मविआ सरकारच्या वतीनं देण्यात आले होते. असंही फडणवीस म्हणालेत.

  पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती असल्याचंही त्यांनी सांगतिलं. मातोश्रीचे (Matoshree) दरवाजे त्यांनी बंद केले पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केलं, त्या उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मातोश्रीचे दरवाजे बंद केले अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली. ज्यांच्यासोबत काम केलं त्यांनी फोन घेणंही बंद केलं. असं ते म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी फोन करुन कर्टसी म्हणूनही उद्धव ठाकरेंनी कळवलं नाही, असंही फडणवीस म्हणाले. मात्र आजही उद्धव ठाकरे यांच्याबाबत कटुता नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

  आजही त्यांच्यासोबत बसून चहा पिऊ शकतो असंही फडणवीस म्हणालेत. तर नुकत्याच एका कार्यक्रमात रश्मी ठाकरे भेटल्या असल्याचं सांगत, त्यांना उद्धव ठाकरेंना नमस्कार सांगा, हा संदेश पाठवल्याचंही फडणवीस म्हणालेत.

  अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार

  राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लवकरच हा विस्तार होील असे त्यांनी सांगितले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हा विस्तार करण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले लवकरच मनपा निवडणुकांचे संकेत राज्यातील कोणत्याही निवडमुकांना बंदी घातलेली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडमुकांबाबतचा निर्णय हा सुप्रीम कोर्टात आहे. येत्या ६ किंवा ७ फेब्रुवारीला त्याबाबत सुनावणी होणार असून लवकरच याचा निर्णय होील असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

  मुख्यमंत्री होणार नाही, हे पहिल्या दिवसाापासून माहित

  एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचाच अदृश्य हात असल्याचं फडणवीस यांनी मान्य केलं. मात्र बंडानंतर येणाऱ्या सरकारमध्ये ते स्वता मुख्यमंत्री असणार नाहीत, हे पहिल्या दिवसांपासून माहित होतं. त्याचा निर्णयच आपण केलेला होता, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. याबाबत वरिष्ठांना जेव्हा कळवले तेव्हा त्यांचा होकार येण्यासाठी थोडा वेळ लागला, असंही ते म्हणाले. मात्र उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय वेटो पद्धतीनं आपल्याला सांगण्यात आल्याचं ते म्हणाले. मात्र आता पक्षाचा हा निर्णय योग्य असल्याचं जाणवत असल्याची कबुलीही त्यांनी दिलीय.