
फिरोजला हत्यार आणण्यासाठी मध्यप्रदेशात नेण्यात आलं. त्यानंतर ठाणे महापालिकेत बैठक झाली. काही आमिष देखील देण्यात आली मात्र फिरोजने त्या कामासाठी नकार दिला. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला धमकी आल्यानंतर फिरोज समोर आला.
मुंबई : आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी काल सभागृहात त्यांना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचा मुद्दा मांडला होता (Yesterday, the issue was raised in the House that there was a conspiracy to kill him), त्यातील साक्षीदार आज त्यांनीच माध्यमांसमोर आणला. या संदर्भात आज आव्हाड यांनी फिरोज (Firoz) या व्यक्तीला माध्यमांसमोर आणलं
फिरोजला हत्यार आणण्यासाठी मध्यप्रदेशात नेण्यात आलं. त्यानंतर ठाणे महापालिकेत बैठक झाली. काही आमिष देखील देण्यात आली मात्र फिरोजने त्या कामासाठी नकार दिला. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला धमकी आल्यानंतर फिरोज समोर आला. फिरोजने आव्हाड यांना या संदर्भात सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेतील अधिकारी महेश आहेर यांनी आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी महेश आहेर यांना राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका कार्यालयाबाहेर चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर महेश आहेर यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिलं होतं.